पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई वडिलांच्या आठवणीने भावुक झाले. दिवंगत शिवाजीराव देसाई यांची आज चाळीसावी पुण्यतिथी होती. त्यानिमित्त पाटण मरळी येथे कारखाना कार्यस्थळावर अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना वडील शिवाजीराव देसाई यांच्या आठवणीने शंभूराजे देसाई भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांचा बोलताना त्यांचा कंठ दाटून आला होता.