भाईंदर पूर्व येथील इंद्रलोक- 6 परिसरात गॅस सिलेंडर चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शुक्रवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास दोन युवक ऑटो रिक्षाने घटनास्थळी आले. त्यानंतर त्यांनी चहाच्या टपरीची रेकी केली. संधी मिळताच एका युवकाने टपरीत प्रवेश करून तेथे ठेवलेला गॅस सिलेंडर उचलला आणि तो ऑटो रिक्षामध्ये ठेवून घटनास्थळावरून पसार झाला.