प्रशासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मीरा-भाईंदर महानगरपालिकेने आता आक्रमक पवित्रा घेतला असून, प्रभाग 6 मधील 'रॉयल गार्डन हॉटेल'सह बफर झोनमध्ये येणाऱ्या इतर अनधिकृत बांधकामांवर आज पालिकेचा हातोडा पडला आहे. अतिशय महत्त्वाच्या अशा या कारवाईत बफर झोनमधील सर्वच अतिक्रमणे पूर्णपणे निष्कासित करण्यात आली असून, महापालिकेने भूमाफियांना कडक इशारा दिला आहे.