मीरा-भाईंदरमध्ये महायुती तुटल्याची घोषणा नरेंद्र मेहता यांनी केली आहे. शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती न करता भाजप स्वबळावर निवडणूक लढणार आहे. प्रताप सरनाईक यांच्या मते, नरेंद्र मेहता यांच्या अहंकारी वृत्तीमुळे युती फिस्कटली, तर सीटवाटपावरूनही मतभेद झाले.