भाईंदर पश्चिमेला मॅक्सस मॉल परिसरात काही दुकानांवर महापालिकेने संध्याकाळी 7 च्या सुमारास कारवाई केली. यात मराठी असलेल्या आंटीस वडापाव आणि मी मराठी एकीकरण असलेल्या मराठी माणसांच्या गाड्या सामानासहित तोडल्या. याच कारणावरून त्यांनी रस्त्याच्या मध्येच तुटलेले सामान, हातगाडीचे तुकडे टाकून रस्त्यावर ठिय्या दिला. हप्ते घेता मग कारवाई का? भैय्याची गाडी सोडली, आम्ही मराठी म्हणून आमच्यावर कारवाई केली असा आरोप विक्रेत्यांनी केला आहे.