मीरा रोडच्या पूनम इस्टेट क्लस्टर वनमध्ये बकरी ईद निमित्त आणलेले बकरे सोसायटीबाहेर काढण्याचे काम अखेर सुरू झाले आहे."बकरे तात्काळ बाहेर काढा, अन्यथा इथून हटणार नाही," असा आक्रमक पवित्रा एका गटाने घेतल्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिकेच्या गाड्या आणि पोलिसांचा प्रचंड फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने चोख बंदोबस्तात बकरे बाहेर हटवण्याची कारवाई युद्धपातळीवर सुरू केली आहे.