छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोड नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचारात मुलाच्या प्रचारासाठी वडील आमदार अब्दुल सत्तार मैदानात उतरलेले पाहायला मिळाले. आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर अ. सत्तार सिल्लोड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिंदे यांच्या शिवसेनाकडून उभे आहेत. सिल्लोड शहरात अब्दुल सत्तार यांच्याकडून मुलाच्या रॅलीचे तसेच कॉर्नर मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते.