शिवसेना नेते, आमदार भास्करराव जाधव यांनी आज मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथील बहादुरशेख नाका येथील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. दोन वर्षांपूर्वी बहादूरशेख नाका येथे या उड्डाणपुलाचा एक मोठा भाग गर्डरसह कोसळला होता.