रायगड जिल्ह्यातील स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरील ऐतिहासिक जगदीश्वर मंदिर येथे भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी दर्शन घेतले. यावेळी पडळकरांनी मंत्रिपदासाठी साकडे घातल्याने त्यांच्या मंत्रीपदाच्या शक्यतेवर चर्चा सुरू झाली आहे. आगामी त्यांना संधी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.