धुळे जिल्ह्यातील शेतपिकांची पाहणी करताना वार्सा फाट्याजवळील मळगाव शिवारात आमदार मंजुळा गावित यांनी इतर शेतकऱ्यांसोबत मिळून भात लावणी केली. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी त्यांनी थेट त्यांच्या जीवनात सहभागी होत हा अनुभव घेतला. त्यांच्या या भूमिकेमुळे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून आला.