बदनापूर अंबड मतदारसंघाचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी आज अंबड तालुक्यातील विविध तांडा वस्तीवर जाऊन बंजारा समाज बांधवाचा पारंपरिक आणि सर्वात मोठा असलेल्या होळी आणि धुलिवंदन सण साजरा केला. या वेळी बंजारा बांधवसोबत नारायण कुचे यांनी पारंपरिक असलेल्या लेंगी नृत्यावर ठेका धरला.