विदर्भात मान्सूनने अद्याप दमदार हजेरी लावलेली नसतानाच शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. मात्र पावसाचा लांबलेला खंड लक्षात घेता आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांना पेरणीची घाई करू नये, असे आवाहन केले आहे. राणा यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत आपल्या शेतात नागरणी करत शेतीची मशागत केली.