सांगलीत सेलिब्रिटी क्रिकेट लीग स्पर्धेचा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार, खासदारांचा संघ विरुद्ध सिनेकलाकार संघ यांच्यात जोरदार सामना रंगला. यामध्ये खासदार विशाल पाटील, खा. धैर्यशील माने, आमदार विश्वजीत कदम, राहुल आवाडे, सुहास बाबर, रोहित पाटील, सत्यजित देशमुख सहभागी झाले होते. यावेळी आमदार रोहित पवार यांनी षटकांचा पाऊस पाडला.