राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याकडून नंदुरबार तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी सुरू करण्यात आली आहे. रोहित पवार यांनी तालुक्यातील भालेर आणि रनाळा या दुष्काळग्रस्त गावांना भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.