मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदामंत्री यांच्या नेतृत्वाखाली, पुण्यश्लोक यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्षानिमित्त सुरू असलेल्या या पवित्र गोदा ते नर्मदा जलजागृती यात्रा 2026 चौंडी ते माहेश्वरी गेले पाच दिवस चालू आहे. या प्रवासात एसटीमधून वारकऱ्यांसमवेत प्रवास करताना भक्ती, श्रद्धा आणि समर्पणाचा अद्भुत संगम आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनुभवला. टाळ-मृदुंगाच्या गजरात दुमदुमणारा प्रवास, मुखातून अखंड घुमणारे अभंग, आणि विठुरायाच्या नामस्मरणात हरवलेले वारकरी हे सर्व वातावरण मनाला अक्षरशः भारावून टाकणारे होते.