शिवाजी कोण होता या पुस्तिकेचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी फोनवर अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती. यांबद्दल त्यांनी आता दिलगिरी व्यक्त केलीय. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख नेहमी सन्मानपूर्वकच व्हावा, ही आपली ठाम भूमिका असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.