आष्टी तालुक्यातील खलाटवाडी येथील शेतकऱ्यांच्या दोन दिवसात अतिवृष्टीने जे नुकसान झाले त्याची आमदार सुरेश धस यांनी ट्रॅक्टरमध्ये बसून या भागातील नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.यामध्ये परिसरातील तुडुंब भरून वाहिलेल्या विहिरी असतील तसेच कांदा,बाजरी,सोयाबीन,राजमासह आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानाची माहिती घेऊन तात्काळ सोबत असलेले कृषी अधिकारी गोरख तरटे यांना जलदगतीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.