आमदार सुरेश धस यांचा आष्टी तालुक्यात बांधावर जाऊन दुष्काळ ग्रस्त भागाची पाहणी केली. पावसाअभावी उभी पिके वाया; शेतकरी-पशुपालकांच्या समस्या जाणून घेतल्या. दिवाळीपूर्वी शेतकरी मदतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश स्वागतार्ह आहे. पावसाने पाठ फिरवल्याने आष्टी तालुक्यासह आष्टी-पाटोदा-शिरूर परिसरात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांच्या हातची उभी पिके वाया गेल्याचे विदारक चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी आज आष्टी तालुक्यातील मांडवा, वटणवाडी, शेरी बु. आणि खकाळवाडी परिसराचा दुष्काळी पाहणी दौरा करून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला.