कृपाशंकर सिंग यांनी मीरा भाईंदरचा महापौर उत्तर भारतीय होणार असे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून मनसेने मीरा भाईंदर शहरात ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. "मीरा भाईंदरचा महापौर मराठीच होणार" असा संदेश या बॅनरद्वारे देत मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत महापौर पदावरून मराठी अस्मितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.