महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाकडून आज मीरा-भाईंदरमध्ये मराठी भाषेच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात एका चिमूकल्याने छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेली दिसून आली. मोर्चाच्या ठिकाणी या लहानग्या मुलाने अंगावर काटा आणणारी गारद म्हंटली.