पनवेल महानगर परिसरातील कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल तसेच खारघरच्या काही भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः मध्यरात्रीच्या वेळी वीज गायब होत असल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत असून अनेक ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनही केले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महावितरण प्रशासनाच्या निषेधार्थ तिरडी मोर्चा काढण्यात आला.