मनसे नेते गजानन काळे यांनी नवी मुंबईतील भाजप उमेदवारांच्या गुजराती प्रचार पत्रकांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. मराठीला राज्यभाषेचा दर्जा असतानाही गुजरातीचा वापर करून मराठी भाषेला दुय्यम स्थान का दिले जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नवी मुंबईची आगरी-कोळी आणि मराठी अस्मिता जपण्याची मागणी मनसेने केली आहे.