सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीत रोज 2 तास मोबाईल टीव्ही न पाहण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अनगरमध्ये रोज सायंकाळी 7 ते 9 पर्यंत मोबाईल आणि टीव्हीचा वापर बंद राहणार आहे. अनगरच्या नूतन नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुलांच्या आरोग्य आणि भविष्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असं प्राजक्ता पाटील यांनी म्हटलं आहे.