परळी रेल्वे स्टेशन परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने परळी लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बल (RPF) यांच्या संयुक्त पथकाकडून मॉक ड्रिल व दहशतवाद विरोधी कारवाईचे प्रात्यक्षिक (डेमो) सादर करण्यात आले. या मॉक ड्रिलद्वारे आपत्कालीन परिस्थितीत कशी तत्काळ व प्रभावी कारवाई करण्यात येते, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यामुळे प्रवासी व नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण झाली.