नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये तापमानात मोठी घट झाल्याने दवबिंदू गोठायला सुरुवात झाली आहे. मोलगी परिसरातील डबा आणि वलंबा भागांत भाताच्या चाऱ्यावर गोठलेले दवबिंदू स्पष्ट दिसत आहेत, जणू बर्फाची चादरच पसरली आहे. यामुळे स्ट्रॉबेरी, गहू, हरभरा या पिकांना फायदा होत असला तरी, थंडीमुळे जनजीवन प्रभावित झाले आहे.