महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नालासोपाऱ्यात मतदारांना पैसे वाटप करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी 10 लाख 9 हजार रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. पैशांची पाकिटं एका प्लास्टिकच्या पिशवीत टाकून गाडीतून घेऊन जाताना पेल्हार ब्रिजजवळ रात्री अडीच वाजता आरोपीला पडकण्यात आलं. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.