मतदानाला दोन दिवस बाकी असतानाच पैसे वाटण्याचे प्रकार पुढे आले आहेत. मुंबईतील हा व्हिडीओ आहे. एक तरुण मतदारांना पैसे वाटताना दिसत आहे. तो कोणत्या पक्षाचा आहे, कुठून आला याची माहिती नाही. टीव्ही9 मराठीही या व्हिडीओला दुजोरा देत नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.