पुणे : शिरूर तालुक्यातील रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटात निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाल्याची चर्चा सुरू असतानाच आता कारेगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर काही कार्यकर्त्यांनी नोटा उधळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिसरात खळबळ उडाली आहे. व्हिडिओमध्ये विजयानंतर काही जण सार्वजनिक ठिकाणी नोटांचा वर्षाव करताना दिसत आहेत.