राज्यात दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू असताना, भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील रोहना गावात मंडई कार्यक्रमात अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य तथा माजी उपसभापती देवा चकोले यांनी पैशांची उधळण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकारावर काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.