बुलढाणा शहरातील अष्टविनायक नगरमध्ये असलेल्या स्वामी समर्थ मंदिर परिसरात एका माकडाच्या पिल्लामागे काही मोकाट कुत्रे लागले होते. यानंतर हा माकड जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत होते, मात्र माकडाचे पिल्लू या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाले. या माकडाच्या पिल्लाला परिसरातील नागरिकांनी मोकाट कुत्र्याच्या तावडीतून सोडविले. याची माहिती वन्यजीव विभागाला दिली असता वन्यजीव विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी माकडाला रेस्क्यू करून त्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.