नंदुरबार शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून माकडांचा धुमाकूळ सुरू आहे. माकड शाळांमध्ये घुसून विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ले करत असल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. माकडांच्या भीतीमुळे शिक्षकांकडून विशेष खबरदारी घेत विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात आहे. शाळांचे मुख्य दरवाजे आणि वर्गखोल्यांचे दरवाजे बंद ठेवून अध्यापन सुरू आहे.