नांदेडच्या धर्माबाद शहरात वानराने धुमाकूळ घातलाय, त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांवर वानर हल्ले करून जखमी करत आहे. या वानराने केलेला हल्ला सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झालाय. आक्रमक झालेल्या माकडांमुळे धर्माबाद शहरात दहशत पसरलीय. वनविभागाने पिंजरा आणून या वानराचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.