सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीतून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार तानाजी पाटील यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई हे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. मंत्री शंभूराज देसाई हे जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर कार्यालयाच्या पोर्चमध्ये थांबवलेल्या मंत्री शंभूराज देसाई यांच्या वाहनावर मात्र वानराने कब्जा केला.