अकोला जिल्ह्यात सोयाबीन पिकांवर माकडांचा हल्ला झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतातील उभ्या सोयाबीन पिकांमध्ये माकडांचं कळप घुसून पिक खात असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.