नांदेड जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली असून वाढत्या तापामानापासून आपला बचाव व्हावा आणि पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून वानरांनी आपला मोर्चा आता गावाकडे वळवला आहे. लोहा तालुक्यातील मारताळा गावातल्या शाळेतील दाट झाडीत वानरांनी मुक्काम ठोकला आहे.