नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा परिसरात माकडांचा हैदोस वाढल्याने नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा, मशिदी आणि बाजारपेठेत माकडांच्या सततच्या उच्छादामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. ऐन परीक्षा काळात शाळांमध्ये व्यत्यय येत असून, काही ठिकाणी नागरिकांना चावा घेण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. परिस्थिती गंभीर बनत चालल्याने वन विभागाने तातडीने कारवाई करून या माकडांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.