अंबरनाथ पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून वाट काढताना अंबरनाथकरांचे दररोज मोठे हाल होतायत. शिवाय खड्ड्यांमुळे उड्डाणपुलावर मोठी वाहतूक कोंडीही होतेय. मात्र याकडे नगरपालिका लक्ष देत नसल्याचा आरोप करत मनसे शहर उपाध्यक्ष बबलू खान आणि प्रकाश नलावडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेनं आज उड्डाणपुलावर अनोखं आंदोलन केलं. कार्यकर्त्यांनी चक्क पीपीई किट घालून खड्ड्यांमध्ये मुनवॉक केला.