अमरावती शहरात जोरदार वादळी पावसाने २० पेक्षा जास्त झाडांची पडझड झाली आहे. मुख्य रस्त्यावर अनेक झाडे कोसळली असल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अर्धा तास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अमरावती शहरात अनेक झाडे उन्मळून पडली. अमरावती महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यावर पडलेली झाडे हटवण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू करण्यात आला आहे. अमरावतीच्या इर्विन चौक ते बियानी चौकापर्यंत ही झाडे उन्मळून पडली आहेत.