पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी खासदार अमर काळे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. नुकसानग्रस्त भागाची खासदार अमर काळे यांनी पाहणी केली. आष्टी तालुक्यात अतिवृष्टीने केलेल्या नुकसानीची खासदार अमर काळे यांनी पाहणी केली आणि जिल्हाधिकारी तसेच तहसीलदारांशी फोनवरून चर्चा करून तातडीने पंचनामे करण्याच्या खासदारांनी सूचना केल्यात. आष्टी तालुक्याला अतिवृष्टीचा जोरदार फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आष्टी तालुक्यात सोयाबीन कपाशी संत्रा पिकाला जोरदार अतिवृष्टीचा फटका बसलाय.