माझ्या हत्येच्या कटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील मास्टरमाईंड आहेत असा गंभीर आरोप माजी आमदार राम सातपुते यांनी केला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. माझी हत्या कॉन्ट्रॅक्ट किलिंग पद्धतीने करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. माळशिरस तालुक्यात 3 दिवसापासून पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.