धडगाव तालुक्यातील वडफळ्या इथल्या होळी उत्सवात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. याठिकाणी नंदुरबारचे खासदार गोवाल पाडवी आणि माजी मंत्री के. सी. पाडवी यांनी आदिवासी बांधवांच्या सोबतीने पारंपारिक नृत्यावर ठेका धरला. ढोल-पावरीच्या तालावर आणि जयघोषात खासदार पिता-पुत्रांनी नृत्याचा मनमुराद आनंद लुटला.