भंडारा शहरातील भिलेवाडा परिसरात मंडई निमित्त जलसा व कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भंडाराचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांनी केवळ प्रेक्षक म्हणून न राहता प्रत्यक्ष कबड्डी खेळून मैदानात उतरून खेळाडूंचा उत्साह वाढवला.