सज्जनगड येथील घाटामध्ये एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झालाय. मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. ब्रेक फेल झालेले लक्षात येताच त्याने घाटाच्या विरुद्ध बाजूला झुडपामध्ये गाडी घालून प्रवाशांचे प्राण वाचवले. बसमध्ये 50 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते, त्यामध्ये शाळकरी मुलांचा देखील समावेश होता. अपघातात तीन ते चार प्रवासी किरकोळ जखमी झालेत. तर काही प्रवाशांना आपत्कालीन दरवाज्यातून बाहेर काढण्यात आले.