एसटीच्या तिकिटाचं आरक्षण करणाऱ्यांना आजपासून १५ टक्के सूट मिळणार आहे. दिवाळी आणि उन्हाळी हा सुट्टीचा हंगाम वगळता वर्षभर एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अरक्षण करताना १५ टक्के सूट मिळणार आहे. तर लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी अगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना ही सूट मिळणार आहे.