भीषण उन्हाळ्याचा तडाखा बसत असतानाच मुक्ताईनगर आणि वडादा वनपरिक्षेत्रातील वन्यजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जंगलातील नैसर्गिक जलस्रोत आटल्याने आणि वन विभागाचे कृत्रिम पाणवठे कोरडे ठाक पडले आहेत. यावर्षी पाण्यासाठी वेळेवर निधीचा प्रस्ताव सादर न झाल्याने वन्यजीवांचे हाल होत असल्याचा आरोप होत आहे.