बीड शहरातील एका शिवभोजन केंद्रामध्ये आज सकाळी एका टेबलवर एकच जेवणाची थाळी ठेवण्यात आली होती आणि त्या थाळीच्या समोर एका मागून एक व्यक्ती बसवून फोटो काढले जात होते. एका तरुणाने या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामुळे शिवभोजन केंद्रातला मोठा घोटाळा समोर आला आहे. बोगस फोटो काढून आणि शिवभोजन थाळीचा शेकडो लोकांनी लाभ घेतल्याचं रेकॉर्डवर दाखवून लाखो रुपये लाटले जात असल्याचं यामुळे समोर आलं आहे. याबाबत आता प्रशासनाकडून तपास करून संबंधित शिवभोजन केंद्रावर कारवाई केली जाते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.