मुंबईतील वाढते वायू प्रदूषण फुफ्फुसांच्या कर्करोगाला आमंत्रण देत आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या कर्करोग तपासणी मोहिमेत ही धक्कादायक बाब समोर आली असून, मुंबईतील निदान झालेल्या रुग्णांमध्ये प्रदूषणाशी संबंधित फुफ्फुसांच्या कर्करोगाचे प्रमाण ५७% इतके वाढले आहे. या धोकादायक परिस्थितीपासून वाचण्यासाठी मुंबईकरांनी घराबाहेर पडताना N95 मास्क वापरणे महत्त्वाचे आहे.