मुंबई महानगरपालिकेचा २०२४-२५ चा अर्थसंकल्प २५ फेब्रुवारी रोजी सादर होईल. आयुक्त भूषण गगराणी हे स्थायी समिती अध्यक्षांकडे हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. प्रशासक वाढीव अर्थसंकल्पाची परंपरा कायम राखणार का, तसेच यंदाचा अर्थसंकल्प तुटीचा की वाढीव असेल, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले आहे.