मुंबई बीएमसी निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून, अनेक तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे. मानखुर्द शिवाजीनगरमधून नवनाथ बन, तर वॉर्ड क्रमांक 47 मधून तेजिंदर सिंग तिवाना अर्ज दाखल करणार आहेत. तसेच, माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी आणि जितेंद्र पटेल यांनाही उमेदवारी मिळाली आहे, ज्यामुळे भाजपची मोर्चेबांधणी स्पष्ट झाली आहे.