मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप निश्चित झाले आहे. यानुसार, भाजप 137 जागांवर तर शिवसेना 90 जागांवर निवडणूक लढवणार आहे. रिपाइसह इतर घटक पक्ष याच आकड्यांमध्ये समाविष्ट केले जातील. 227 जागांपैकी 150 हून अधिक जागा जिंकून मराठी महापौर बसवण्याचे महायुतीचे उद्दिष्ट आहे.